‘रेरा’अंतर्गत खात्यांवर कॉसमॉस बॅंकेचे व्याज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - ‘रेरा’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्रकल्पानुसार उघडलेल्या बॅंक खात्यावर मोठ्या प्रमाणात शिल्लक रक्कम विनाव्याज पडून राहते. ही बाब विचारात घेऊन कॉसमॉस को-ऑप. बॅंकेने ‘रेरा’अंतर्गत उघडलेल्या खात्यांवर विशिष्ट रक्कम शिल्लक ठेवून उर्वरित रक्कम ‘फ्लेक्‍झी फिक्‍स्ड’ या ठेव योजनेत वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिक व विकसकांना शिल्लक रकमेवर बचत खात्यावर लागू असलेला व्याजदर (सध्या ४ टक्के) मिळणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिली.

मे २०१७ पासून ‘रेरा’ कायद्यांतर्गत बांधकाम व्यावसायिक आणि विकसकांना आपल्या प्रत्येक प्रकल्पाचे स्वतंत्र खाते शेड्युल्ड बॅंकेमध्ये उघडणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ‘एस्क्रो’ खात्यात एकूण प्रकल्पाच्या सत्तर टक्के रक्कम जमा होणे आवश्‍यक असते. त्यानुसार जमा झालेल्या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नव्हते; परंतु कॉसमॉस 
बॅंकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे काही अंशी व्याजाचे उत्पन्न संबंधित खातेदारांना मिळू शकेल, अशी माहिती बॅंकेने दिली आहे.