कॉसमॉस बॅंकेच्या आरती ढोले यांना पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या वर्षाकरिता पुरस्कार मिळाला आहे. नुकताच जयपूर येथे पुरस्कार वितरण समारंभ झाला. या समारंभास कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हेही उपस्थित होते. हा पुरस्कार एसव्हीसी बॅंकेचे माजी महाव्यवस्थापक रविकिरण मनकीकर व ठाणे जनता सहकारी बॅंकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सतीश उत्तेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ढोले या कॉसमॉस ई-सोल्यूशनच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. काळानुरूप तंत्रज्ञानात बदल, तंत्रज्ञानांचा नावीन्यपूर्ण वापर, नवीन तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने वापरण्याचे कौशल्य आदी घटकांच्या निकषांवर या पुरस्काराची निवड केली गेली. बॅंकेच्या ध्येयधोरणाअंतर्गत ग्राहकांना सेवा देण्यासाठी वेळोवेळी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात कॉसमॉस बॅंक आघाडीवर राहिली आहे. बॅंकेच्या या तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये ढोले यांचा मोलाचा वाटा असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: arthavishwa news cosmos bank award goes to aarti dhole