क्रायोजेनिक्‍स भारतातील दुग्धउत्पादन वाढविणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नाशिक - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड व क्रायोजेनिक समूहाची नाशिकमध्ये नुकतीच बैठक झाली. इम्डियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. मिलिंद अत्रे यांनी या बैठकीचे उद्‌घाटन केले. लाइव्हस्टॉक मंडळाचे देशभरातील मुख्य कार्यकारी अधिकारी, दूध उत्पादक संघटना, पशुसंवर्धनासंबंधी संघटना आदींचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. 

पशुसंवर्धनामध्ये इंडियन ऑइल क्रायोजेनिक महत्त्वाची भूमिका बजावते. सदृढ बैलांच्या प्रजातींचे बीज (सीमेन) वितरण करण्यात क्रायोजेनिकचा वाटा मोठा असल्याचे मुख्य व्यवस्थापक श्रीकृष्ण चावरू यांनी सांगितले. बाएफ फाउंडेशनचे उपप्रमुख डॉ. ए. बी. पांडे यांनीही क्रायोजेनिकच्या वितरण व्यवस्थेचे कौतुक केले. प्राण्यांच्या कृत्रिम गर्भधारणा क्षेत्रामध्ये व्यापक बदल होत आहेत. या सर्वांमुळे दुग्ध उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

ग्लोबल गुड्‌सचे संचालक डॉ. मेरी कॉनेट यांनी क्रायोजेनिक्‍सच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. तांत्रिक पातळीवर सहकार्य करण्याचे आश्‍वासन डॉ. कॉनेट यांनी दिले.

टॅग्स