महागाई कमी राहण्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - मॉन्सून सरासरीएवढा झाल्यास अन्नधान्याच्या किमती स्थिर राहतील, असे सांगत रिझर्व्ह बॅंकेने महागाई दराचा अंदाज घटवला आहे. बॅंकेच्या पतधोरण समितीची दोनदिवसीय बैठक गुरुवारी (ता. ५) संपली. या वेळी बॅंकेने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत महागाईचा दर ४.७ टक्के ते ५.१ टक्के राहील, असा सुधारित अंदाज व्यक्त केला.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ‘आरबीआय‘ने महागाई दर ५.१ ते ५.६ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. दुसऱ्या सहामाहीतदेखील महागाई दर ४.४ टक्के राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. मॉन्सूनची कामगिरी आणि वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिल्यास महागाई स्थिर राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. फेब्रुवारीत महागाई दर अपेक्षेपेक्षाही कमी होता.

विकासदरासाठी ‘जीडीपी’चे सूत्र
विकासदर निश्‍चित करण्यासाठी पुन्हा एकदा ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्‍ट (जीडीपी) प्रणाली अंगीकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला आहे. यासाठी आधारभूत वर्ष २०१८ निश्‍चित करण्यात आले आहे. जानेवारी २०१५ पासून ‘ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड’ (जीव्हीए) सूत्रानुसार विकासदर निश्‍चित करण्यात येत होता. आंतरराष्ट्रीय प्रमाणाशी संलग्न होण्यासाठी ‘जीडीपी’चे सूत्र अवलंबण्याचा निर्णय घेतल्याचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी सांगितले.

विकासाला चालना
बॅंकेने विकासदराचा अंदाज वाढवला आहे. चालू वर्षात बॅंकेने विकासदर ७.४ टक्के राहील, असे म्हटले आहे. गेल्या आर्थिक वर्षात विकासदर ६.६ टक्के होता.

Web Title: arthavishwa news dearness