फार्मा शेअर्समुळे सेन्सेक्‍सला तेजीचा डोस

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

सेन्सेक्‍स २४४, तर निफ्टी ७२.४५ अंशांनी वधारला 
मुंबई - प्रमुख कंपन्यांचे आश्वासक निकाल, फार्मा शेअर्समधील तेजी आणि मॉन्सूनच्या प्रगतीने सुखवलेल्या गुंतवणूकदारांनी बुधवारी जोरदार खरेदी केली. ज्यामुळे सेन्सेक्‍स आणि निफ्टी पडझडीतून सावरले. दिवसअखेर सेन्सेक्‍स २४४.३६ अंशानी वधारला आणि ३१ हजार ९५५.३५ अंशाच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ७२.४५ अंशानी वधारला आणि तो ९ हजार ८९९.६० अंशावर बंद झाला.

एफएमसीजी, फार्मा आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सला मागणी होती. मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांनी भरपाई केली. औषध निर्माण क्षेत्रातील शेअर्सला मागणी वाढली. अमेरिकन औषध प्रशासनाकडून भारतीय कंपन्यांच्या उत्पादनांना मंजुरी दिल्याने प्रमुख फार्मा शेअर्स तेजीत होते. अरबिंदो फार्मा, कॅडीला हेल्थकेअर, लुपिन, सण फार्मा या शेअर्समध्ये ४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. त्याचबरोबर आयटीसी आणि रिलायन्समध्ये खरेदी दिसून आली. आयटीसीचा शेअर २ टक्‍क्‍यांनी वधारला. एचपीसीएल, एमआरपीएल आदी शेअर वधारले. आयडिया आणि भारती एअरटेलमध्ये मोठी वाढ झाली. निफ्टी मंचावर कोटक महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, एसबीआय, ॲक्‍सिस आदी शेअर वधारले.