आर्थिक फसवणुकीला सेबीचा लगाम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मुंबई - आमिष दाखवणारे बनावट कॉल; तसेच क्रेडिट कार्डची माहिती घेऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने कंबर कसली आहे. गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक फसवणुकीविरोधात जागृती करण्यासाठी ‘सेबी’कडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

‘सेबी’ने टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून प्रभावी प्रचार सुरू केला आहे. बनावट कॉल; तसेच आमिष दाखवणारे मेसेज कसे ओळखावे, याबाबत नागरिकांना आणि किरकोळ गुंतवणूकदारांना सर्तक करण्यात आले आहे. नागरिकांनी मेसेज अथवा कॉलवर कोणालाही स्वत:ची बॅंक खात्यांची आणि क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये, असे आवाहन सेबीने केले आहे.