मल्ल्यासाठी ‘ईडी’-‘सीबीआय’चे जाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नवी दिल्ली - सक्तवसुली संचालनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी कंबर कसली आहे. मल्ल्याविरोधातील भक्कम पुरावे घेऊन ‘ईडी’ व ‘सीबीआय’चे संयुक्त पथक लंडनला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या दोन्ही तपास यंत्रणांचे पथक मल्ल्याविरोधातील आरोपपत्रही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडे पुरावा म्हणून सादर करणार आहेत. भारतीय तपास यंत्रणा ब्रिटीश सरकारला मल्ल्यासंबंधीचे ईडीने लावलेले आरोप, तसेच त्यासंबंधीचे पुरावे यासह इतर कायदेशीर कागदपत्रांचाही यामध्ये समावेश असणार आहे. यानंतर न्यायालयात ब्रिटन सरकार मल्ल्याविरोधात भारत सरकारच्या वतीने बाजू मांडणार आहे. मल्ल्या प्रकरणामध्ये ‘ईडी’ फ्रान्स, सिंगापूर, मॉरिशस, आयर्लंड, अमेरिका तसेच संयुक्त अरब अमिराती आदी देशांचे चौकशीसाठी सहकार्य घेणार आहे.