एतिहादला १.८७ अब्ज डॉलरचा तोटा

पीटीआय
शुक्रवार, 28 जुलै 2017

अबुधाबी - अबुधाबीस्थित एतिहाद एअरवेजला गेल्या वर्षी १.८७ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे.  

अबुधाबी - अबुधाबीस्थित एतिहाद एअरवेजला गेल्या वर्षी १.८७ अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे.  

संयुक्त अरब अमिराती सरकारच्या मालकीच्या एतिहाद एअरवेजला जुनी विमाने बदलून नवी विमाने घेण्यात १.०६ अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. वेळेआधी विमाने बदलणे, विमानांच्या किमतीतील बदल यामुळे हा फटका बसला आहे. तसेच, कंपनीने ॲलिटॅलिया आणि एअरबर्लिन कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक फारशी यशस्वी ठरली नाही. यामुळे ८० कोटी डॉलरचा फटका बसला. याचबरोबर इंधनाची जुनीच कंत्राटे कायम ठेवल्याने कंपनीचे नुकसान झाले आहे. एतिहादची सुरवात २००३ मध्ये झाली असून, आखातातील स्पर्धक विमान कंपन्या एमिरेट्‌स आणि कतार एअरवेजशी स्पर्धा करीत कंपनीने जोरदार वाटचाल केली आहे. 

एतिहादचा ॲलिटॅलियामध्ये ४९ टक्के, एअर बर्लिन २९ टक्के, एअर सेशल्स ४०, व्हर्जिन ऑस्ट्रेलिया १९.९ टक्के आणि भारतातील जेट एअरवेजमध्ये २४ टक्के हिस्सा आहे.