अखेर ‘निफ्टी’ दहा हजार अंशांपार!

अखेर ‘निफ्टी’ दहा हजार अंशांपार!

मुंबई - समाधानकारक तिमाही निकाल आणि गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्याने आज राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ला दहा हजार अंशांचे ऐतिहासिक शिखर सर करण्यात यश मिळाले. दिवसअखेर निफ्टी ५६.१० अंशांनी वधारून १०,०२०.६५ अंशांच्या पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्‍स’ने १५४.१९ अंशांच्या वाढीसह ३२,३८२.४६ अंशांचा नवा उच्चांक गाठला. 

भांडवली गुंतवणुकीचा ओघ सातत्याने वाढत असून, दोन्ही निर्देशांक नवा उच्चांक प्रस्थापित करीत तेजीवर स्वार झाले आहेत. आशिया आणि युरोपातील सकारात्मक संकेतांनी गुंतवणूकदारांचा खरेदीचा पवित्रा कायम आहे. आज धातू, वाहन उत्पादक कंपन्या, औषध कंपन्या आणि काही निवडक बॅंकिंग शेअरमध्ये चांगली खरेदी दिसून आली. त्याचबरोबर तिमाही निकालांचे परिणामदेखील बाजारावर दिसून येत आहेत. पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी करणाऱ्या यस बॅंकेचा शेअर सहा टक्‍क्‍यांनी वधारला. ‘जीई टी अँड डी’च्या शेअरमध्ये २० टक्‍क्‍यांची वाढ झाली. शेअर बाजाराच्या माहितीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २५) बाजारात २७०.७७ कोटींची गुंतवणूक केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र २०९.५० कोटींच्या शेअरची विक्री केली.  मुंबई शेअर बाजारात सन फार्मा, आयसीआयसीआय बॅंक, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल, एमएमटीसी, सिप्ला, एनटीपीसी आदी शेअर वधारले. ॲक्‍सिस बॅंकेच्या शेअरला मात्र विक्रीचा फटका बसला.

‘निफ्टी’चा दहा हजारी प्रवास  
तारीख                    ‘निफ्टी’ 

२१ एप्रिल १९९६      १००० 
२ डिसेंबर २००४       २००० 
३० जानेवारी २००६    ३००० 
१ डिसेंबर २००६       ४००० 
२७ सप्टेंबर २००७    ५००० 
११ डिसेंबर २००७     ६००० 
१२ मे २०१४            ७००० 
१ सप्टेंबर २०१४      ८००० 
१४ मार्च २०१७        ९००० 
२६ जुलै २०१७         १००००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com