फसवे दावे करणाऱ्या जाहिराती आवरा!

पीटीआय
सोमवार, 24 जुलै 2017

केंद्र सरकारचा दूरचित्रवाणी वाहिन्यांना इशारा; आयुष मंत्रालयाने घेतले आक्षेप 
नवी दिल्ली - आयुर्वेद आणि होमिओपॅथिक उत्पादनांविषयी अतिशयोक्तीपूर्ण दावे करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांना आज केंद्र सरकारने निर्वाणीचा इशारा दिला. वाहिन्यांनी अशा जाहिरातींना आवर घालावा, अशी सूचना माहिती व प्रसारण मंत्रालयाने (आयबी) केली आहे.

काही कंपन्या त्यांची आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधे, तसेच उत्पादनांविषयी चुकीचे दावे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयूष मंत्रालयाने याप्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे धाव घेतली आहे. यावरून आयबीने वाहिन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ‘दूरचित्रवाणी वाहिन्यांनी उत्पादानाबाबतचे वैध प्रमाणपत्र असलेल्या कंपन्यांच्या जाहिराती प्रसारित कराव्यात. याचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहिनीवर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती मंत्रालयाचे संचालक अमित काटोच यांनी दिली. काही जाहिराती व कार्यक्रमांमध्ये स्वयंघोषित वैद्य किंवा गुरू संबंधित उत्पादनाची महती ‘सर्व रोगांवर रामबाण उपाय,’ असे नमूद करून दिशाभूल करतात, असे ते म्हणाले.

...तर कारवाई होणार
फसव्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रसिद्धी देणे हे ’औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०’चे उल्लंघन असून, ग्राहकांचे हित पाहता याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कडक केली जाईल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचनेत नमूद आहे.