‘ह्युंडाई’तर्फे २४वे फ्री कार केअर क्‍लिनिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - ह्युंडाई मोटर इंडिया लि. या कंपनीकडून राष्ट्रीय स्तरावर २४वे फ्री कार केअर क्‍लिनिक आयोजित करण्यात आले आहे. १२ जुलै ते २१ जुलैदरम्यान कंपनीने हा कार्यक्रम राबविला आहे. फ्री कार केअर सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे गुरुवार व शुक्रवार (ता. २० व २१) असे दोनच दिवस शिल्लक असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. 

‘२४व्या फ्री कार केअर क्‍लिनिक’चे उद्‌घाटन डीलर प्रिन्सिपल विनायक गारवे, एचबीसी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ सिद्धार्थ जागिरदार, रिअल इस्टेट डेव्हलपर धीरज रांका आणि गारवे मोटर्सचे जनरल मॅनेजर विराज महाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

फ्री कार क्‍लिनिकमध्ये कार हेल्थ चेक अपसह इंजिन तपासणी, उत्सर्जन, इलेक्‍ट्रिकल सिस्टीम, अंडर बॉडी, एसी, बाह्य रूप आदी बाबींची तपासणी करण्यासाठी ५० हेल्थ चेकअप पॉइंट्‌स उपलब्ध असणार आहेत. 

याशिवाय स्पेअर पार्टस, कामगार शुल्क व इतर व्हॅल्यू ॲडेड सेवांवर सवलतीसह जुन्या कारच्या एक्‍स्चेंजसाठी आकर्षक ऑफर ठेवण्यात आल्या आहेत.