‘एचडीएफसी’चा नफा ३८९४ कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून, बॅंकेचा निव्वळ नफा २० टक्‍क्‍यांनी वधारून रु. ३८९४ कोटींवर पोचला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो रु. ३२३९ कोटी होता. बॅंकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही २० टक्के वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत बॅंकेला रु. ९३७१ कोटींचे निव्वळ व्याज उत्पन्न मिळाले आहे. बॅंकेला अन्य स्रोतांपासून मिळालेले उत्पन्न २५ टक्के वाढीसह रु. ३५१७ कोटींवर पोचले आहे.