‘जॉयअलुक्कास’वर प्राप्तिकर विभागाचे छापे 

‘जॉयअलुक्कास’वर प्राप्तिकर विभागाचे छापे 

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने जॉयअलुक्कास समूहाच्या सोन्याच्या शंभर दुकानांवर आणि कार्यालयांवर बुधवारी छापे घातले. करचुकवेगिरीच्या संशयावरून हे छापे घालण्यात आले. प्राप्तिकर विभागाच्या चेन्नई कार्यालयातून या छाप्यांचा समन्वय करण्यात आला. देशभरात प्राप्तिकर विभागाचे शंभर अधिकारी आणि पोलिस पथकांनी ही कारवाई केली. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील जॉयअलुक्कास समूह आणि त्याच्याशी निगडित संस्थांवर ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी केरळमध्ये त्रिचीसह अन्य ठिकाणी, तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, पश्‍चिम बंगाल या राज्यांतील आणि चेन्नई आणि हैदराबाद या शहरांतील जॉयअलुक्कास समूहाच्या दुकाने आणि कार्यालयांवर छापे घातले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर करचुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांची चौकशी करण्यात प्राप्तिकर विभागाकडून सुरू आहे. जॉयअलुक्कासवरही करचुकवेगिरीचा संशय असल्याने छापे घातले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com