भारत हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश - अकबर

पीटीआय
गुरुवार, 25 जानेवारी 2018

दावोस - भारत हा जबाबदार अण्वस्त्रधारी देश असून, अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे आमचे धोरण असल्याचे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आज येथे स्पष्ट केले. अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत जागतिक स्तरावर कृती का होत नाही, असा सवालदेखील त्यांनी या वेळी केला.

जागतिक आर्थिक परिषदेत ‘आंतरराष्ट्रीय सुरक्षेला असलेला अण्वस्त्रांचा धोका’ या विषयावरील चर्चासत्रात अकबर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अनेक देश अण्वस्त्रे म्हणजे अंतिम पर्याय मानून क्षेपणास्त्रे हा इशारा असल्याचे मानतात. भारत हे जबाबदार आण्विक राष्ट्र असल्याचे सारे जग मानते. कोणी आम्हाला तसे म्हणते म्हणून आम्ही तसे नसून, आम्हाला तसे हवे आहे म्हणूनच तसे आहोत.’’

भारत व पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्रधारी असल्याच्या प्रश्‍नावर अकबर म्हणाले, ‘‘आमच्यापुरते सांगायचे झाल्यास आम्ही कदापि अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही. जागतिक स्तरावर अशा प्रकारे करार करावा, असे आमचे मत आहे. भारताला आपल्या या शांततावादी धोरणाचा अभिमान वाटतो.’’

Web Title: arthavishwa news India is responsible nuclear country