शेअर ‘बायबॅक’चा ‘इन्फोसिस’चा विचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ‘इन्फोसिस’ची १३ हजार कोटींचे शेअर ‘बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरच्या ‘बायबॅक’ प्रस्तावावर विचार केला जाणार असल्याचे समजते.
गेल्या महिन्यात ‘विप्रो’नेदेखील ११ हजार कोटी रुपयांचे शेअर ‘बायबॅक’ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रतिशेअर ३२० रुपये याप्रमाणे शेअर खरेदी करणार असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. याआधी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपनीने शेअर बायबॅक योजना हाती घेतली होती. त्यावेळी कंपनीने सुमारे २५०० कोटींचे शेअर ‘बायबॅक’ केले होते.