एचडीएफसी बॅंकेची व्याजदरात कपात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील व्याजदरात कपात जाहीर केली आहे. बचत खात्यासाठी द्विस्तरीय व्याजदर पद्धत बॅंकेने अंमलात आणण्याचे ठरविले आहे. ५० लाख रुपयांपर्यंतची शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर यापुढे साडेतीन टक्के आणि ५० लाख रुपयांहून अधिक शिल्लक असणाऱ्या बचत खात्यावर चार टक्के व्याज दिले जाईल, असे बॅंकेने म्हटले आहे. १९ ऑगस्टपासून नवे व्याजदर लागू होतील, अशी माहिती बॅंकेने शेअर बाजाराला दिली आहे.

स्टेट बॅंकेने एक ऑगस्टपासून एक कोटींपर्यंत शिल्लक असलेल्या बचत खात्यांवर साडेतीन टक्के आणि एक कोटींहून अधिक शिल्लक असलेल्या बचत खात्यावर चार टक्के व्याज देण्याचे जाहीर केले होते.

‘स्टुडंट कार्ड’ची घोषणा
चंडीगड : एचडीएफसी बॅंकेने परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘एचडीएफसी बॅंक आयएसआयसी (इंटरनॅशनल स्टुडेंट आयडेंटीटी कार्ड) स्टुडंट फॉरेक्‍स प्लस कार्ड’ची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या कार्डच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांचे परदेशातील शिक्षण सुकर होणार आहे. स्टुडंट कार्डच्या वापराने सर्व प्रकारचे व्यवहार करता येणार असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्टुडंट कार्डवर अमेरिकन डॉलर, पौंड, युरो आदी चलनांद्वारे व्यवहार केला जात आहे.