मध्य प्रदेश पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - मध्य प्रदेश पर्यटन मंडळाने मध्य प्रदेशातील विविध पर्यटनस्थळांचा प्रसार करण्यासाठी पुण्यात एका ‘रोड शो’चे आयोजन केले होते. या वेळी मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत पांडे आणि कार्यकारी संचालक ओम विजय चौधरी; तसेच मंडळाचे इतर अधिकारी उपस्थित होते. 

पांडे म्हणाले, की पर्यटन क्षेत्रातील विविध संबंधित घटकांना एकाच व्यासपीठावर आणणे आणि त्यांच्यासमोर या राज्यात असलेल्या पर्यटनसंधी सादर करणे, हे उद्दिष्ट ठेवून या ‘रोड शो’चे आयोजन केले गेले. देशातील आर्थिक क्षेत्रात झपाट्याने वाढणारे; तसेच पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवणुकीची अमाप संधी असलेले राज्य म्हणून मध्य प्रदेशाची ओळख आहे. मध्य प्रदेश हे गुंतवणुकीचेही महत्त्वपूर्ण स्थान आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने राज्य अधिक आकर्षक बनविण्यासाठीही सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे खासगी गुंतवणूक करणाऱ्यासाठी ही चांगली संधी आहे. राज्य सरकारनेही विविध व्यासपीठावर या गुंतवणूकयोग्य ठिकाणांचा गेल्या काही काळात प्रसार केला आहे.

खजुराहो नृत्य महोत्सव, मालवा उत्सव, तानसेन महोत्सव, अल्लादिन संगीत महोत्सव या सर्व महोत्सवांच्या माध्यमातून मध्य प्रदेशात पर्यटकांची मने जिंकण्याची संधी आहे, असे पांडे यांनी सांगितले.