कामगार निवृत्तिवेतनात वाढ करू - बंडारू दत्तात्रेय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

शिर्डी - अल्प निवृत्तिवेतनधारक गटातील कामगारांच्या निवृत्तिवेतनात भरीव वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच निवृत्तिवेतनामध्ये वाढ होईल. यापूर्वीच्या कोशिआरा समितीच्या शिफारशींहून वाढ अधिक असण्याची शक्‍यता आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कामगारांच्या पूर्वीच्या ५० रुपये दरमहा निवृत्तिवेतनाच्या रकमेत हजार रुपयांपर्यंत वाढ केली,’’ असे प्रतिपादन केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आज केले.

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेतर्फे आयोजित पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते. दिवंगत कामगार नेते व संघटनेचे संस्थापक बबनराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अधिवेशनाला प्रारंभ झाला. या वेळी दत्तात्रेय म्हणाले, ‘‘मोदी सरकारने कामगारांचा किमान वेतनदर वाढविला. त्यांना घरबांधणीसाठी दीड लाख रुपये अंशदान देण्याची योजना जाहीर केली. असंघटित क्षेत्रातील कामगार व गरिबांसाठी अल्प खर्चात अपघातविमा योजना सुरू केली. कामगारांची प्रतिष्ठा वाढावी, त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याचबरोबर कामगारांसाठी नगरमध्ये शंभर खाटांचे ‘सुपरस्पेशालिटी’ रुग्णालय सुरू करू.’’