‘पीएनबी’कडून कर्जदरात कपात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) कर्जाच्या दरात कपात केली आहे. पीएनबीने किमान कर्जदर ०.२० टक्‍क्‍यांनी कमी करून ९.१५ टक्के इतका केला आहे. त्यामुळे आता ‘ईएमआय’ कमी होणार असून, ‘पीएनबी’च्या किमान दराशी निगडित गृहकर्जधारकांना दिलासा मिळणार आहे. हे दर उद्यापासून (१ सप्टेंबर) लागू करण्यात येणार आहेत.

पीएनबीने किमान कर्जदर ९.३५ टक्‍क्‍यांवरून कमी करून ९.१५ टक्के केला आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट मध्ये देखील कपात जाहीर केली आहे. त्यात ०.२० ते ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली असून, तो आता ८.१५ टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीसाठी तो ८ टक्के करण्यात आला आहे.

Web Title: arthavishwa news loan rate decrease by PNB

टॅग्स