‘नॅसकॉम’च्या अध्यक्षपदी देवयानी घोष यांची निवड

Devyani-Ghosh
Devyani-Ghosh

नवी दिल्ली - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची (आयटी) शिखर संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’च्या अध्यक्षपदी ‘इंटेल कॉर्पोरेशन’च्या दक्षिण आशिया विभागाच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या देवयानी घोष यांची निवड झाली आहे. 

येत्या एप्रिलमध्ये घोष ‘नॅसकॉम’ची सूत्रे स्वीकारतील. ‘नॅसकॉम’च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. पुरुषांची मक्‍तेदारी असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात लिंगभेद नष्ट करून महिलांना समान स्थान देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. घोष यांनी तब्बल २० वर्षे ‘इंटेल कॉर्पोरेशन’मध्ये विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारापेठेतील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी ‘नॅसकॉम’ची भूमिका त्यांच्या कार्यकाळात निर्णायक ठरणार आहे. 

पुरुष आणि महिला यांच्यातील बुद्धिमत्तेला पडताळणे आवश्‍यक आहे. अनेक माहिती तंत्रज्ञान सेवा पुरवठादारांना महिला कर्मचाऱ्यांना विवाहानंतर सेवेत कायम ठेवताना अडचणींचा सामना करावा लागतो. महिला कर्मचाऱ्यांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्‍यक असल्याचे घोष यांनी म्हटले आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात सुमारे ४० लाख कुशल मनुष्यबळ असून, त्यापैकी एक तृतीयांश महिला आहेत. दुर्दैवाने एकाही आयटी कंपन्यांच्या प्रमुखपदी महिला नसल्याबद्दल घोष यांनी खंत व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com