‘सॅमसंग’ची ‘नेव्हर माइंड’ ऑफर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

पुणे - सॅमसंग इंडियाने सणासुदीचे निमित्त साधून ‘सॅमसंग’चे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ‘नेव्हर माइंड’ ही ऑफर आज जाहीर केली. याअंतर्गत खरेदीनंतर एक वर्षभरात एकदा ‘स्क्रीन रिप्लेसमेंट’ मिळू शकणार आहे. 

पुणे - सॅमसंग इंडियाने सणासुदीचे निमित्त साधून ‘सॅमसंग’चे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ‘नेव्हर माइंड’ ही ऑफर आज जाहीर केली. याअंतर्गत खरेदीनंतर एक वर्षभरात एकदा ‘स्क्रीन रिप्लेसमेंट’ मिळू शकणार आहे. 

सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी आज येथे याची घोषणा केली. ते म्हणाले, की २१ सप्टेंबर ते २१ ऑक्‍टोबर २०१७ या कालावधीत खरेदी केल्या जाणाऱ्या फोनसाठी ही सवलत लागू असेल. ही सवलत सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना खरेदीनंतर स्क्रीन तुटल्यास ९९० रुपयांच्या किमतीत बारा महिन्यांच्या कालावधीत एकदा बदलून दिली जाणार आहे. ही सवलत नऊ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या फोनसाठी आहे. यात जे, ए, सी मालिका आणि ऑन सीरिज आणि प्रमुख एस मालिका आणि नोट मालिका यांचा समावेश आहे. 

सणांच्या निमित्ताने ‘सॅमसंग’ने अलीकडेच ‘गॅलेक्‍सी नोट ८’ भारतात सादर केला. त्याचे ‘प्री-बुकिंग’ही सुरू झाले आहे. सॅमसंग गॅलेक्‍सी ‘जे’ मालिका ही भारतातील सर्वांत लोकप्रिय स्मार्टफोनची मालिका आहे आणि अलीकडेच गॅलेक्‍सी जे ७ प्रो आणि गॅलेक्‍सी जे ७ मॅक्‍सचे अनावरण करण्यात आले व त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘ही तर ग्राहकांना पोचपावतीच’
‘‘ग्राहकप्रधान नावीन्यपूर्णतः आणि सर्वोत्तम उत्पादने आणि सेवा देणे यावरच आमचे लक्ष केंद्रित आहे, यामुळेच सॅमसंग इंडिया भारतातील सर्वोत्तम ब्रॅंड ठरला आहे. ‘नेव्हर माइंड’ या सवलतीमागे महाराष्ट्रातील लोकांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विचार करण्यात आला आहे. सॅमसंगने नेहमीच ग्राहकांसाठी मूल्याधिष्ठित सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ग्राहकांच्या आनंदाला प्राधान्य देणारी ही नवी सवलत त्याचीच पोचपावती आहे,’’ असे पुल्लन म्हणाले.

ठळक वैशिष्ट्ये
१० रुपये दर्शनी मूल्याच्या १२ कोटी शेअरची विक्री
‘आयपीओ’साठी रु. ६८५-७०० किंमतपट्टा निश्‍चित
एसबीआयच्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रतिशेअर रु. ६८ ची सवलत