जुन्या मोटारी, दागिन्यांच्या विक्रीवर ‘जीएसटी’ नाही!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

नवी दिल्ली  - केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. एखाद्या नागरिकाच्या जुन्या मोटारीच्या किंवा जुन्या दागिन्यांच्या विक्री व्यवहारावर वस्तू व सेवाकराची (जीएसटी) आकारणी होणार नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार कोणत्याही व्यवसायात मोडत नसल्यामुळे यावर कोणताही कर आकारण्यात येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.   

दरम्यान, देशातील व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायांचे ‘जीएसटी’अंतर्गत ३० जुलैपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. तसेच २० लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना नोंदणी करण्याची आवश्‍यकता नसल्याचेही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपल्या परिपत्रकामध्ये म्हटले आहे.

व्यावसायिकांकडे वैध पॅन कार्ड, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आदी असल्यास ऑनलाईन नोंदणी करणे शक्‍य आहे. यासाठी https://www.gst.gov.in/ या वेबपोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.