‘ओप्पो’तर्फे ब्युटी तंत्रासह ‘एफ-५’ सादर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

मुंबई - ‘ओप्पो’ या सेल्फी एक्‍स्पर्ट ब्रॅंडने पहिले एफएचडी प्लस फुल स्क्रिन डिस्प्ले असलेले ओप्पो ‘एफ-५’ हे मॉडेल नुकतेच सादर केले. या डिव्हाईसमध्ये ए.आय. ब्युटी तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सेल्फी इमेजमधील वैयक्तिक ब्युटीफिकेशनसाठी तयार करण्यात आले आहे. ए.आय. ब्युटी तंत्रज्ञान सेल्फी फोटोग्राफीला नव्या स्तरावरील दर्जा मिळून देईल, असे कंपनीने म्हटले आहे.

‘एफ-५’च्या विक्रीला येत्या नऊ नोव्हेंबरपासून सुरवात होईल आणि हा स्मार्टफोन ऑनलाइन व ऑफलाइन उपलब्ध असेल. या डिव्हाईसच्या सादरीकरण कार्यक्रमादरम्यान ‘ओप्पो’ने तरुणांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एफ-५ ६जीबी एडिशन आणि एफ-५ युथ ही आणखी दोन मॉडेल दाखल केली. ही दोन्ही मॉडेल डिसेंबरमध्ये उपलब्ध होतील, असे ओप्पो इंडियाचे अध्यक्ष आणि ओप्पोचे जागतिक उपाध्यक्ष स्काय ली यांनी सांगितले. ‘ओप्पो’ने नवा ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणून बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची निवड केली आहे. दीपिका पदुकोण आधीपासूनच कंपनीची ब्रॅंड ॲम्बेसिडर आहे.