पेपे जीन्स भारतात ५० स्टोअर उभारणार

पीटीआय
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोलकाता - डेनिम आणि कॅज्युअल कपड्यांची प्रमुख कंपनी पेपे जीन्स भारतात ५० स्टोअर उभारण्याच्या तयारीत आहे. यामध्ये २० स्टोअर चालू आर्थिक वर्षात उभारण्यासाठी कंपनी पावले उचलत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मात्र स्टोअर उभारणीचा आकडा आगामी काळामध्ये वाढण्याची शक्‍यता असल्याचे या वेळी कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

भारतामध्ये सध्याच्या उदारीकरणाच्या धोरणाचा फायदा उठविण्याचे कंपनीचे प्रयत्न असून, एक सिंगल ब्रॅंड म्हणून कंपनीचा विस्तार करण्याचा मानस असल्याचे पेपे जीन्सचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक कविंद्र मिश्रा यांनी सांगितले.