‘पीएनजी डायमंड्‌स’ आता पीएनजी ब्रदर्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - हिऱ्यांच्या व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्‌स अँड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रूपात सर्वांसमोर आले असून, यापुढे ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे. 

पुणे - हिऱ्यांच्या व्यवसायातील एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्‌स अँड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रूपात सर्वांसमोर आले असून, यापुढे ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे. 

या संदर्भातील औपचारिक घोषणा पीएनजी ब्रदर्सचे संचालक अक्षय गाडगीळ यांनी केली. पीएनजी ब्रदर्सच्या संचालिका पद्मिनी गाडगीळ, रोहन गाडगीळ, नुपूर गाडगीळ याबरोबरच ब्रॅंड ॲम्बॅसिडर व प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट आणि पीएनजी ब्रदर्सच्या माध्यम प्रमुख अरुंधती भिडे या वेळी उपस्थित होत्या. ‘पीएनजी ब्रदर्स’च्या नव्या बोधचिन्हाचे अनावरणही या वेळी प्रिया बापट हिच्या हस्ते करण्यात आले.

या संदर्भात अक्षय गाडगीळ म्हणाले, की सोन्याच्या दागिन्यांबरोबरच हिऱ्यांना व हिऱ्यांच्या दागिन्यांना महत्त्व आले आहे. विस्तारत चाललेला हा व्यवसाय लक्षात घेत आम्ही आमची एक नवी ओळख बनविली आहे. या वर्षीच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधत या नव्या ओळखीबरोबरच, एका नव्या संकल्पनेसह आम्ही ग्राहकांसमोर आलो आहोत. ग्राहकांना एकाच छताखाली हिऱ्यांच्या दागिन्यांचे अनेक पर्याय उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने आम्ही खास ‘डायमंड लाउंज’चे पहिले दालन लक्ष्मी रस्त्यावर सुरू केले आहे. याचे उद्‌घाटन आज प्रिया बापट आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक शां. ब. मुजुमदार आणि गाडगीळ कुटुंबिय उपस्थित होते. 

नजीकच्या भविष्यात शहराच्या महत्त्वाच्या भागांत विस्तार करण्याचा मानस आहे, अशी माहिती रोहन गाडगीळ यांनी दिली.