शेअर बाजारावर दबाव कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील दबाव कायम राहिला. गुरुवारी (ता. २१) सेन्सेक्‍स ३०.४७ अंशांच्या घसरणीसह ३२,३७० अंशांवर बंद झाला. निफ्टीतही १९.२५ अंशांची घट होऊन तो १० हजार १२१ अंशांवर बंद झाला. चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने दोन महिन्यांचा तळ गाठला. 

विकासाला चालना देण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर निर्देशांकातील घसरणीला ब्रेक लागला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी १,१८५ कोटींची गुंतवणूक काढून घेतली.