‘लघुउद्योजकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य’ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई - लघुउद्योगाला आता संघटित होण्याची गरज आहे. राज्य आणि केंद्र सरकारला लघुउद्योजकांची काळजी असून, या क्षेत्राच्या समस्या सोडविण्याला सरकारचे प्राधान्य राहील, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा, कोळसा आणि नव आणि नवीकरणक्षम ऊर्जा आणि खाण खात्याचे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. लघू उद्योग भारतीने सूक्ष्म आणि लघुउद्योजकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संमेलनात ते बोलत होते. 

लघुउद्योगांसाठी अनेक योजना हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटीमुळे खरेदी विक्रीची सगळी माहिती आपोआप पटलावर येणार असल्याने चौकशीचा समेसिरा वाचेल. यामुळे प्रामाणिक उद्योजकांना कोणतीच चिंता करावी लागणार नाही. जीएसटी म्हणजे शून्य रिटर्न आणि एकच स्टेटमेंट इतकी सुलभ व्यवस्था असल्याचे गोयल यांनी सांगितले.