पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे नवे दालन कोथरूडमध्ये सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे - पु. ना. गाडगीळ अँड सन्सने कर्वे रस्त्यावरील हॅपी कॉलनी (कोथरूड) येथे नवे दालन सुरू केले असून, त्याचे उद्‌घाटन महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि प्राज इंडस्ट्रीजच्या परिमल चौधरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी अजित गाडगीळ, रेणू गाडगीळ आणि सीईओ अमित मोडक यांच्यासह सतीश कुबेर, प्रफुल्ल वाघ, श्रीकांत कुबेर, सुनील पाठक, नंदू देवळे व दालनाचे व्यवस्थापक अमित जाधव, गणेश वेदपाठक उपस्थित होते.

हे भव्य दालन नऊ हजार चौरस फुटांचे असून, या ब्रॅंडचे हे १९ वे दालन आहे. दोन मजली दुकानात सोने-चांदी-हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी स्वतंत्र विभागांबरोबर कस्टमाइज्ड, डिझायनर ज्वेलरीसाठी विशेष सुविधा आहे. कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी या दालनातही आर्ट गॅलरी असून, ती नवोदित व स्थानिक कलाकारांना विनामूल्य उपलब्ध केली जाईल, असे श्री. अजित गाडगीळ यांनी सांगितले. कलात्मक, नाजूक, पारंपरिक व डिझायनर दागिन्यांची मोठी श्रेणी येथे उपलब्ध आहे. तसेच, सिग्नेचर डिझाईनचे दागिनेही आहेत, असे रेणू गाडगीळ यांनी नमूद केले. या वर्षी आम्ही दसरा-दिवाळी ‘उत्सव विविधते’चा म्हणून साजरा करीत आहोत. या अंतर्गत सोने-चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, आजपासून ‘कुबेर’ योजना नव्या स्वरूपात सादर केली आहे, असे अमित मोडक यांनी सांगितले.

Web Title: arthavishwa news puna gadgil & sons new showroom start in kothrud