बुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट - रजनीश कुमार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - आगामी काळामध्ये बुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाकडे उद्दिष्ट ठेवून काम करणार असल्याचे मत भारतीय स्टेट बॅंकेचे (एसबीआय) नवनिर्वाचित व्यवस्थापकीय संचालक (एमडी) रजनीश कुमार यांनी व्यक्त केले. सध्या भारतीय बॅंका बुडीत कर्जांसंबंधी ऐतिहासिक संकटाचा सामना करत आहेत. त्यामुळे येत्या काळात बुडीत कर्जांचा भार कमी करण्याचे बॅंकांपुढे लक्ष्य असेल, असे कुमार यांनी सांगितले.