पुण्यातील ‘रांका ज्वेलर्स’ ठरले इंडियाज मोस्ट प्रिफर्ड ज्वेलर्स

पुणे - यूबीएम इंडिया या संस्थेच्यावतीने पुण्यातील रांका ज्वेलर्सला ‘इंडियाज मोस्ट प्रिफर्ड ज्वेलर्स’ या किताबाने नुकतेच गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सेन हिच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून) तेजपाल रांका, शैलेश रांका, यूबीएम इंडिया
पुणे - यूबीएम इंडिया या संस्थेच्यावतीने पुण्यातील रांका ज्वेलर्सला ‘इंडियाज मोस्ट प्रिफर्ड ज्वेलर्स’ या किताबाने नुकतेच गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेत्री चित्रांगदा सेन हिच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना (डावीकडून) तेजपाल रांका, शैलेश रांका, यूबीएम इंडिया

पुणे - ज्वेलरी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून देशाची औद्योगिक प्रगती करणाऱ्या भारतातील ज्वेलर्सचे सर्वेक्षण यूबीएम इंडिया या संस्थेद्वारे नुकतेच करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर ‘इंडियाज मोस्ट प्रिफर्ड ज्वेलर्स’ हा किताब महाराष्ट्रातील ‘रांका ज्वेलर्स’ला देण्यात आला. या सर्वेक्षणात शुद्धता, डिझाइन, विश्‍वासार्हता, लोकप्रियता, ग्राहक सेवा, परत येणारे ग्राहक अशा विविध निकषांवर कसोटी घेण्यात आली. 

सुवर्ण व्यवसायात १८७९ पासून कार्यरत असणाऱ्या रांका ज्वेलर्सला मोठी परंपरा आहे. रांकांची चौथी पिढी आज या व्यवसायात असून, सुवर्ण व अलंकारांच्या बाजारपेठेत सातत्याने त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. शुद्धता, सचोटी आणि आपुलकी या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या या पेढीला मोठा ग्राहकवर्ग लाभला आहे.

त्याचप्रमाणे पारंपरिक अलंकारांसोबतच आधुनिक युगातील अलंकार घडविण्यात रांका ज्वेलर्स आघाडीवर आहेत. महिलावर्गात लोकप्रिय असलेले रांका ज्वेलर्स कॉर्पोरेट जगतातही विश्‍वासार्ह ब्रॅंड आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपलेली आहे. ही सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच यूबीएम इंडियाने ‘रांका ज्वेलर्स’ची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com