‘रोटोमॅक’चा मालक अटकेत

Vikram Kothari
Vikram Kothari

नवी दिल्ली - कर्ज गैरव्यवहार-प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज ‘रोटोमॅक पेन्स’ कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल यांना अटक केली. विविध बॅंकांची एकूण ३,६९५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

कोठारी याने व्यवसायासाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून चौकशी सुरू होती. ‘रोटोमॅक’ कंपनीने सात बॅंकांकडून कर्ज घेत ते विविध खात्यांमध्ये फिरवत फसवणूक केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. कोठारी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात सक्तवसुली संचालनालयानेही भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. कोठारी आणि त्याच्या कुटुंबीयांना देशाबाहेर जाण्यापासून रोखण्याचा आदेश कालच (ता. २१) देण्यात आला होता.

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले, की तीन दिवसांच्या कसून चौकशीनंतरही कोठारी आणि त्याच्या मुलाने बॅंकांच्या फसवणुकीसाठी कोणती पद्धत वापरली, तसेच त्यांच्या बॅंक खात्यांमध्ये आलेल्या पैशांचा कसा वापर केला, याची माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
‘रोटोमॅक’चा मालक विक्रम कोठारी याने ७ बॅंकांकडून कर्ज घेतले होते; मात्र ते परत केलेच नाही, त्यामुळे सीबीआयने विक्रम कोठारीच्या तीन ठिकाणांवर छापेमारी केली होती. दरम्यान, गुरुवारी ‘रोटोमॅक’चा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारीला समन्स बजावत चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात बोलावले होते; मात्र त्यानंतर सीबीआयने या दोघांवर अटकेची कारवाई केली.

बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, अलाहाबाद बॅंक आणि ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स या बॅंकांकडून विक्रम कोठारीने कर्ज उचलले होते; मात्र ते परत करण्यात आले नाही. विक्रम कोठारीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीबीआयने या गैरव्यवहाराशी संबंधित अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत, ज्यावरून या गैरव्यवहाराची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com