‘मेक फॉर इंडिया’सह सॅमसंग गॅलेक्‍सी नोट-८

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - स्मार्टफोन जगतात नवनवे क्रांतिकारी बदल होत असून, या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सने भारतीयांच्या गरजा लक्षात घेऊन ‘गॅलेक्‍सी नोट-८’ हा अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असा स्मार्टफोन येथे सादर केला.

याशिवाय ‘सॅमसंग’ने बिक्‍सबी व्हॉइस क्षमता ‘मेक फॉर इंडिया’सह सादर केली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये इंटेलिजंट ‘बिक्‍सबी’ची नावीन्यपूर्णता सादर होईल. बिक्‍सबी गॅलेक्‍सी नोट-८ आणि गॅलेक्‍सी एस ८ आणि एस ८ प्लस उपकरणांमध्ये उपलब्ध असेल, असे कंपनीचे (नैॡत्य आशिया) अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग यांनी सांगितले. 

गॅलेक्‍सी नोट-८मध्ये ग्राहकांना मोठा डिस्प्ले प्राप्त होईल. या फोनमधील एस पेनद्वारे अधिक चांगल्या मार्गांनी संपर्क साधता येईल, तसेच ‘सॅमसंग’च्या दुहेरी कॅमेरासह दुहेरी ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनची सेवा मिळणार आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षण, जलद गतीने होणारे वायरलेस चार्जिंग, पॉवरफुल कामगिरी, सुरक्षेसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशेन पर्याय देण्यात आले आहेत. यात इरिस आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंगचा समावेश आहे, याशिवाय फेस रेकग्नेशन, पिन, पॅटर्न व पासवर्ड याचाही समावेश आहे. गॅलेक्‍सी नोट-८ भारतात २१ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी १२ सप्टेंबरपासून पूर्वनोंदणी सुरू झाली आहे. ६७,९०० रुपयांच्या किमतीचा हा फोन मिडनाइट ब्लॅक व मेपल गोल्ड कलर्स या रंगांत उपलब्ध असेल.