सेन्सेक्‍सने ओलांडली ३२ हजार अंशांची वेस

पीटीआय
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबई - जागतिक बाजारातील पूरक वातावरणाने गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम राहिल्याने मंगळवारी (ता.१२) सेन्सेक्‍सने ३२ हजार अंशांची वेस ओलांडली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २७६.५० अंशांच्या वाढीसह ३२ हजार १५८ अंशांवर बंद झाला. निफ्टी ८७ अंशांच्या वाढीसह १० हजार ९३ अंशांवर बंद झाला. 

स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीमध्ये आघाडी घेतली आहे. सोमवारी त्यांनी ८७७.३७ कोटींची खरेदी केली. त्यामुळे निर्देशांकाला मोठा हातभार लागला. याउलट परदेशी गुंतवणूकदार विक्रीच्या मूडमध्ये आहेत. त्यांनी ३९२.५२ कोटींची विक्री केली. मुंबई शेअर बाजारात टाटा स्टील, सन फार्मा, टाटा मोटर्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा आदी शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. 

रुपयात ११ पैशांचे अवमूल्यन 
चलन बाजारात रुपयाला मात्र झळ बसली. बॅंका आणि आयातदार कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने चलन बाजारात रुपयाचे डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी अवमूल्यन झाले आणि तो ६४.०४ वर स्थिरावला.