सेन्सेक्‍सच्या तेजीचा ‘षटकार’

पीटीआय
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - फार्मा व बॅंकिंग क्षेत्रातील समभागांमुळे सेन्सेक्‍स सलग सहाव्या दिवशी वधारला. सकाळच्या सत्रात चांगल्या सुरवातीनंतर दुपारी नफेखोरी वाढल्याने वाढीला ब्रेक लागला. दिवसाअखेर सेन्सेक्‍स ५५.५२ अंशांनी वाढून ३२,२७३.६७ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ७.३० अंशांच्या वाढीसह १०,०८६.६० अंशांवर बंद झाला. 

दिवसभरात मिडकॅप इंडेक्‍स ०.५७ टक्‍क्‍यांनी वाढून उच्चांकी पातळीवर बंद झाला. सन फार्मासह ॲक्‍सिस बॅंक, टाटा मोटर्स, अदानी स्पोर्टस, सिप्ला, डॉ. रेड्डीज आदी कंपन्यांचे समभाग वधारले होते. विप्रो, कोटक बॅंक, ओएनजीसी, एम अँड एम, भारती एअरटेल आदी कंपन्यांचे शेअर ४.१० टक्‍क्‍यांपर्यंत घसरले.

Web Title: arthavishwa news sensex increase