घसरणीला लगाम

घसरणीला लगाम

मुंबई - सलग चार दिवसांच्या घसरणीला लगाम लावत आज (सोमवार) आठवड्याची सकारात्मक सुरवात झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६.७८ अंशांनी वधारून ३२ हजार ८६९.७२ अंशांवर स्थिरावला; तर निफ्टी ५.९५ अंशांनी वधारून १० हजार १२७.७५ अंशांवर व्यवहार करत बंद झाला.

गुंतवणूकदारांमध्ये संचारलेल्या उत्साहामुळे शेअर बाजारात खरेदीचा जोर होता. क्षेत्रीय पातळीवर आयटी, टीईके, मेटल आणि हेल्थकेअर कंपन्यांच्या शेअर्समध्ये विशेष खरेदी सुरू होती. मात्र येत्या ६ डिसेंबर जाहीर होणारे आरबीआय द्विमाही पतधोरण आणि गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू होते. परिणामी बॅंकिंग, ऑटो, फार्मा, रिअल्टी आणि पॉवर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

आज मुंबई शेअर बाजारात यूएलएल, भारती इन्फ्राटेल, कोल इंडिया, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्‌स, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मारुती सुझुकी या कंपन्यांचे शेअर्समध्ये २.६ ते ०.९ टक्‍क्‍यांची घसरण झाली; तर इन्फोसिस, इंडियाबुल्स हाउसिंग, एचसीएल टेक, हिंडाल्को, झी एंटरटेनमेंट, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी आणि टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारून बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com