सेन्सेक्‍स, निफ्टीत किंचित घसरण

पीटीआय
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण आढावा बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍स व निफ्टीत किंचित घसरण पाहावयास मिळाली. 

दिवसाखेर सेन्सेक्‍स २१.३९ अंकांनी घसरून ३२,४०२.३७ अंशांवर बंद झाला, तर निफ्टीही ५.५५ अंशांच्या घसरणीसह १०,१४७.५५ अंशांवर बंद झाला. बाजारात घसरण असली तरी १५० पेक्षा जास्त शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर होते, 
हे मंगळवारच्या दिवसाचे वैशिष्ट्य होय. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे भारतासह जगभरातील बाजारपेठांच्या नजरा आहेत. त्यामुळे बाजारावर सध्या दडपण आहे.