शेअर बाजारातील तेजीने सेन्सेक्स, निफ्टीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - सकाळच्या सत्रात तेजीने सुरवात करणारा ‘सेन्सेक्‍स’ दिवसअखेर २४.५७ अंशांनी वधारून ३१,७९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त ६.८५ अंशांची किरकोळ वाढ झाली. तो ९,९०४ अंशांवर बंद झाला. 

मुंबई - सकाळच्या सत्रात तेजीने सुरवात करणारा ‘सेन्सेक्‍स’ दिवसअखेर २४.५७ अंशांनी वधारून ३१,७९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त ६.८५ अंशांची किरकोळ वाढ झाली. तो ९,९०४ अंशांवर बंद झाला. 

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या इतिवृत्तात चलनवाढीबाबत चिंता व्यक्‍त करण्यात आली आहे. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्हच्या इतिवृत्तात व्याजदरवाढीबाबत अनिश्‍चितता असल्याने गुंतवणूकदारांवर दबाव दिसून आला. यामुळे बॅंका, वित्तसेवा पुरवठादार कंपन्या, वाहन उत्पादक आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील शेअरची गुंतवणूकदारांनी विक्री केली. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र खरेदीचा पवित्रा कायम ठेवला. त्यांनी ‘इन्फोसिस’च्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामुळे इन्फोसिसचा शेअर ४.५४ टक्‍क्‍यांनी वधारला. त्याचबरोबर कोल इंडिया, एनटीपीसी, भारती एअरटेल आदी शेअर वधारले. ‘निफ्टी’ मंचावर सिप्ला, अदानी पोर्ट, एसीसी, मारुती आदी शेअरमध्ये घसरण झाली. 

‘करन्सी व इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हिज’चे व्यवहार बंद
पारसी नववर्षानिमित्त गुरुवारी (ता. १७) शेअर बाजारातील करन्सी डेरिव्हेटिव्हिज आणि इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्हिजचे व्यवहार बंद होते. मात्र बीएसई आणि एनएसईचे शेअर व्यवहार सुरू होते. कालच्या बातमीत अनवधानाने शेअर बाजार बंद, असा उल्लेख करण्यात आला होता.