शेअर बाजार सावरला

पीटीआय
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - खरेदीसाठी पूरक वातावरण निर्माण झाल्याने संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २२) खरेदीवर भर दिला. यामुळे सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३३ अंशांच्या वाढीसह ३१ हजार २९१.८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ११.२० अंशांच्या वाढीसह ९ हजार ७६५.५५ वर बंद झाला. दोन सत्रांत सपाटून मार खालेल्या इन्फोसिसचा शेअर आज वधारला. 

आयटी, फार्मा कंपन्यांच्या शेअर्सला बाजारात मागणी होती. एचसीएल इन्फोसिस्टमच्या शेअरमध्ये वाढ झाली. तसेच टीसीएसमध्ये खरेदी दिसून आली. फार्मा कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, लुपिन आदी शेअर तेजीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) २०० कंपन्यांना बाजारातून हद्दपार केल्याने बाजारात दबाव दिसून आला. 

सार्वजनिक बॅंकांमधील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चलन बाजारातील उलाढालीवर परिणाम झाल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले. इन्फोसिसच्या शेअरमध्ये ०.२३ टक्‍क्‍याची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली; मात्र गेल्या दोन सत्रांत झालेल्या जवळपास १५ टक्‍क्‍यांच्या घसरणीमुळे इन्फोसिसला सर्वाधिक बाजार भांडवल असलेल्या आघाडीच्या १० कंपन्यांच्या यादीतील स्थान गमवावे लागले आहे.

रुपया वधारला
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात चार पैशांची वाढ झाली. दिवसअखेर रुपया ६४.१० वर बंद झाला.