शेअर बाजारातील तेजी विस्तारली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुंबई - गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने आज शेअर बाजारील तेजी विस्तारली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ८४ अंशांच्या वाढीसह ३१,७३०.४९ अंशांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ३६.५५ अंशांच्या वाढीसह ९९२०.९५ अंशांवर बंद झाला. 

रिॲल्टी, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर, ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या, भांडवली वस्तू आदी क्षेत्रातील शेअरना मागणी दिसून आली. निफ्टी मंचावर ५० पैकी ३० शेअर तेजीसह बंद झाले. यामध्ये विप्रो, मारुती सुझुकी, टाटा पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो आदी शेअर वधारले. बॉश, भारती इन्फ्राटेल, कोल इंडिया, इन्फोसिस, अरबिंदो फार्मा आदी शेअरमध्ये घसरण झाली.