शेअर बाजारात किरकोळ वाढ

पीटीआय
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने सोमवारी (ता.९) शेअर निर्देशांकात किरकोळ वाढ झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३२.६७ अंशांच्या वाढीसह ३१, ८४६.८९ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ९.०५ अंशांच्या वाढीसह ९,९८८.७५ अंशांवर बंद झाला. 

जीएसटी कमी केल्यानंतर बाजारातील एफएमसीजी शेअर्सला मागणी होती. त्याचबरोबर ज्वेलरी उद्योगातील शेअर्सची गुंतवणूकदारांनी खरेदी केली. गीतांजली जेम्स, पीसी ज्वेलर्स, टायटन आणि टीबीझेड आदी शेअर वधारले. 
कोल इंडिया, एचयूएल, कोटक बॅंक, डॉ. रेड्डी लॅब, अदानी पोर्ट, टाटा स्टील आदी शेअरमध्ये वाढ झाली. शेअर बाजाराच्या माहितीनुसार स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी १,०४० कोटींचे शेअर खरेदी केले. एफएमसीजीसह ग्राहकोपयोगी वस्तू, आयटी आदी क्षेत्रात खरेदी दिसून आली.