‘सुनो आरबीआय क्‍या कहता है’ मोहीम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - बनावट कॉलच्या माध्यमातून आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्यांविरोधात सेबीपाठोपाठ रिझर्व्ह बॅंकेनेही दंड थोपटले आहेत. नागरिकांना सतर्क करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच ‘सुनो आरबीआय क्‍या कहता है’ ही मोहीम राबवली जाणार आहे. 

ई-मेल्स, मेसेज आणि फोन कॉल्समधून होणारी फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बॅंक या उपक्रमातून जनजागृती करणार आहे. बॅंकिंग कायदे आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांविषयीची माहिती या उपक्रमातून दिली जाणार आहे. बनावट कॉल तसेच आमिष दाखविणारे मेसेज कसे ओळखावे याबाबत मेसेज आणि ई-मेलमधून सर्तक केले जाणार आहे.