दावा न केलेला विमा दहा हजार कोटींचा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - बंदावस्थेतील बॅंक खाती, इलेक्‍ट्रॉनिक पेमेंटचा मर्यादित वापर, संपर्काची किमान साधने आणि विमा दाव्यासंदर्भातील माहिती न मिळाल्याने लाखो ग्राहकांनी दावा न केलेली विमा रक्कम १० हजार ४६९ कोटींपर्यंत वाढली आहे. विमा सेवा देणाऱ्या मॅक्‍स लाइफ इन्श्‍युरन्स वगळता इतर २२ कंपन्यांच्या दावा न केलेल्या रकमेत वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. 

सर्वसाधारणपणे कंपनीने धनादेश पाठवल्यानंतर केवळ एक चतुर्थांश ग्राहक धनादेश बॅंकेत जमा करत असल्याचे अंतर्गत माहितीत दिसून आले. मॅक्‍स लाइफने याबाबत सर्वेक्षण केले आहे. दाव्याचा परतावा न केलेल्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम अशी आहे, ज्याचे धनादेश सहा महिन्यांपूर्वीच पाठवले आहेत.

यावर वित्त, वितरण आणि प्रचलन या तीन विभागांतील सदस्यांची समिती तयार करून दावा न केलेल्या ग्राहकांचा शोध घेतला. या उपाययोजनेमुळे ३१ मार्चपर्यंत ग्राहकांतर्फे दावा न केलेली रक्कम ५० कोटींपर्यंत कमी झाल्याचे मॅक्‍स लाइफ इन्श्‍युरन्सचे वरिष्ठ संचालक आणि मुख्य वित्त अधिकारी प्रशांत त्रिपाठी यांनी सांगितले.

Web Title: arthavishwa news Ten thousand crores of unclaimed insurance