..तर जीएसटी खाते तत्काळ बंद करा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत ज्या व्यायसायिकांची व्यावसायिक उलाढाल २० लाखांच्या आत असूनही त्यांनी जीएसटीसाठी नोंदणी केली आहे, अशा व्यावसायिकांनी आपले जीएसटी खाते तात्काळ बंद करावे, अशा सूचना केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. जर नोंदणी रद्द करून खाते तत्काळ बंद न केल्यास अशा व्यावसायिकांना कर नोटिसा येण्याची शक्‍यता आहे. केंद्र सरकारच्या जीएसटीच्या संकेतस्थळावर 
याबाबत सूचना समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

जीएसटीअंतर्गत विवरणपत्र तसे च कर भरण्यासाठी केंद्र सरकारने या आधीच २५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे करदात्यांनी विहीत मुदतीमध्ये विवरणपत्र व कर भरण्याचे आवाहन जीएसटीच्या संकेत स्थळावर करण्यात आले आहे.