मल्ल्याने केले अधिकाऱ्यांना ‘मालामाल’

पीटीआय
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - ‘फरार उद्योगपती विजय मल्ल्या कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी राजकारणी व बॅंक अधिकाऱ्यांना विविध सुविधा पुरवायचा,’ अशी माहिती गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) उघड केली आहे. 

मल्ल्याच्या नावे विविध बॅंकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये आयडीबीआयचे सर्वाधिक कर्ज आहे. केंद्रीय अन्वेषणने काही दिवसांपूर्वी मल्ल्यासंदर्भात माहिती मिळविली होती. त्यावरून अर्थ मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी या बॅंकांना किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देण्याचा सल्ला दिला होता, अशी बाब उघड झाली आहे. 

...म्हणून मल्ल्या कर्जबाजारी
राजकारणी, अधिकाऱ्यांना सुविधा देताना कंपनीला मात्र तोटा सहन करावा लागत असे. किंगफिशरच्या संचालक मंडळाला ही गोष्ट माहीत असतानाही त्याची मल्ल्याला कुणकुण लागली नाही. कंपन्या दिवाळखोरीत निघाल्यानंतर मात्र मल्ल्याचे डोळे उघडले.

‘एसएफआयओ’च्या अहवालातील खुलासे
मल्ल्या अनेक राजकारण्यांना किंगफिशर एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास करताना विशेष सूट द्यायचा. या राजकारण्यांना इकॉनॉमी श्रेणीच्या तिकिटाच्या किमतीत बिझनेस क्‍लासने प्रवास करता येत असे; तसेच निवडणुकीच्या काळात मल्ल्या अनेक राजकारण्यांना चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टरची सुविधा पुरवत असे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्यांना किंगफिशर एअलाइन्सच्या प्रथम किंवा बिझनेस श्रेणीतून मोफत प्रवास सुविधा मिळत असे. अनेकदा त्याने अर्ध्या किमतीत तिकिटे दिली. हा तोटा किंगफिशर एअरलाइन्सच्या खात्यात जमा होत असे.

राजकारणी व अधिकाऱ्यांना अशा प्रकारे सुविधा दिल्याने युनायटेड ब्रेव्हरिज या समूहाला अनेक परवानग्या सहज मिळत. 

किंगफिशर एअरलाइन्सच्या अनेक संचालकांचे युनायटेड ब्रेव्हरीज आणि किंगफिशरमध्ये आर्थिक व व्यावसायिक हितसंबंध होते. किंगफिशर एअरलाइन्सने एसबीआय, पंजाब नॅशनल बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा आणि युनायटेड बॅंक ऑफ इंडियासह १७ बॅंकांकडून तब्बल नऊ कोटींचे कर्ज घेतले होते.