‘जिओ’ला टक्कर देण्यासाठी ‘व्होडाफोन’चा ‘२४४ प्लॅन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

मुंबई - रिलायन्स जिओच्या ‘धन धना धन’ या ऑफरला टक्कर देण्यासाठी ‘व्होडाफोन’ने २४४ रुपयांचा प्लॅन आणला आहे. २४४ रुपयांच्या या प्लॅनला ७० दिवसांची वैधता देण्यात आली आहे. 

‘व्होडाफोन’च्या नव्या प्लॅननुसार, ग्राहकाला दररोज १ जीबी ३ जी/४जी डेटा मिळणार आहे. शिवाय वापरकर्त्याला व्होडाफोनच्या कोणत्याही क्रमांकावर अमर्यादित कॉल करता येणार आहे. मात्र, ही योजना प्रथम वापरकर्त्यांसाठीच वैध असणार आहे, याचाच अर्थ सध्याचे वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

‘व्होडाफोन’च्या नव्या प्लॅनचा प्रथम लाभ घेणाऱ्या व्यक्तीला प्लॅनसाठी ७० दिवसांची वैधता असेल. मात्र, पुन्हा याच प्लॅनसाठी फक्त ३५ दिवसांची वैधता असेल. याचबरोबर ‘व्होडाफोन’ने ५६ दिवसांच्या वैधतेसह ३४६ रुपयांची आणखी एक योजना आणली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५६ जीबी डेटा मिळणार आहे.