व्होडाफोन व ‘आयडिया’चे विलीनीकरण २०१८ मध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - दूरसंचार क्षेत्रातील व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्यूलर या नामवंत कंपन्यांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) मंजुरी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर, या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण २०१८ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटले आहे. आयडिया सेल्यूलरचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आणि व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिटिरिओ कोलाओ यांनी आज आपल्या संयुक्त निवेदनात, ‘सीसीआय’च्या निर्णयाचे स्वागत केले.