फोक्‍सवॅगन चीनमधून वाहने परत मागविणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

बीजींग - फोक्‍सवॅगन- एजी आणि त्यांची चिनी सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फोक्‍सवॅगन चीनमधून ४८ लाख वाहने परत मागवणार आहे. सदोष एअरबॅग्जमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एअरबॅग बनवणारी कंपनी टकाटा कॉर्पोरेशन दिवाळखोरीत निघाली आहे. याआधी चीनमधील वाहनांची निगराणी करणाऱ्या संस्थेने जर्मनीची कंपनी जनरल मोटर्स आणि मर्सिडीज कंपनीला त्यांनी ज्या वाहनांसाठी टकाटा कंपनीच्या एअरबॅग्ज वापरल्या आहेत. त्या परत करण्याचा आदेश दिला होता. या संस्थेच्या मते, चीनमध्ये सुमारे २९ लाख वाहनांमध्ये टकाटा एअरबॅग्जचा वापर करण्यात येत आहे.

बीजींग - फोक्‍सवॅगन- एजी आणि त्यांची चिनी सहायक कंपनी एफएडब्ल्यू- फोक्‍सवॅगन चीनमधून ४८ लाख वाहने परत मागवणार आहे. सदोष एअरबॅग्जमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एअरबॅग बनवणारी कंपनी टकाटा कॉर्पोरेशन दिवाळखोरीत निघाली आहे. याआधी चीनमधील वाहनांची निगराणी करणाऱ्या संस्थेने जर्मनीची कंपनी जनरल मोटर्स आणि मर्सिडीज कंपनीला त्यांनी ज्या वाहनांसाठी टकाटा कंपनीच्या एअरबॅग्ज वापरल्या आहेत. त्या परत करण्याचा आदेश दिला होता. या संस्थेच्या मते, चीनमध्ये सुमारे २९ लाख वाहनांमध्ये टकाटा एअरबॅग्जचा वापर करण्यात येत आहे. या एअरबॅग्जमुळे आतापर्यंत सुमारे १६ लोकांचा मृत्यू, तर १८० जण जखमी झाले आहेत.