एयू स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 28 जून रोजी खुला

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

मुंबई: एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) 28 जून रोजी सुरु होत आहे. यासाठी कंपनीने प्रतिशेअर 355 ते 358 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. आयपीओ खरेदीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 30 जून आहे.

कंपनीच्या प्रारंभिक हिस्साविक्री योजनेत विद्यमान भागधारक 'ऑफर फॉर सेल'द्वारे सुमारे 5.34 कोटी शेअर्सची विक्री करतील. यामध्ये इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, वॉरबग पिंकस, ख्रिसकॅपिटल आणि केदारा कॅपिटलचा समावेश आहे. गुंतवणूकदारांना किमान 41 शेअर्स खरेदी करावे लागतील. यापेक्षा अधिक शेअर्स खरेदी करावयाचे असल्यास ही संख्या 41 च्या पटीत असावी. एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे.

रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकेचा परवाना मिळालेल्या कंपन्यांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेचादेखील समावेश आहे. एक्विटास आणि उज्जीवननंतर शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी तिसरी स्मॉल फायनान्स बँक असेल.