‘ऑस्ट्रेलियन फर्स्ट’चा कांगारूंचा नारा

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

नव्या व्हिसा धोरणामुळे भारतीयांना फटका बसणार

मेलबोर्न: ऑस्ट्रेलियन सरकारने देशांतर्गत बेरोजगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी "ऑस्ट्रेलियन फर्स्ट'चा नारा देत पूर्वीचा व्हिसा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा ऑस्ट्रेलियामध्ये हंगामी व्हिसावर काम करणाऱ्या आयटी क्षेत्रातील 78 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. येथे काम करणारे विविध देशांतील
95 हजारांपेक्षाही अधिक कर्मचारी "457 व्हिसा कार्यक्रमा'चा लाभ घेतात.

पूर्वीच्या व्हिसा कार्यक्रमान्वये ऑस्ट्रेलियन कंपन्यांना जेथे स्थानिक कर्मचाऱ्यांची चणचण भासते अशा कौशल्याधारित कामांसाठी परकी देशांमधील मनुष्यबळाचा वापर करणे शक्‍य होते. ""ऑस्ट्रेलियाच्या उभारणीमध्ये स्थलांतरितांचा मोठा वाटा असला तरी येथील रोजगारांसाठी आम्हाला स्थानिक भूमिपुत्रांचा आधी विचार करावा लागेल. यामुळे आम्ही "457 व्हिसा प्रोग्रॅम' रद्द करत आहोत,'' अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी केली. भारतानंतर ब्रिटन आणि अमेरिकेमधील कर्मचारी या व्हिसा प्रोग्रॅमचा लाभ घेतात. 30 सप्टेंबरअखेरची आकडेवारी लक्षात घेतली तर सध्या ऑस्ट्रेलियातील 95 हजार 757 कर्मचारी हे "457 व्हिसा प्रोग्रॅम'चा लाभ घेत आहेत.

नवा कार्यक्रम
ऑस्ट्रेलियात "457 व्हिसा प्रोग्रॅम'ची जागा आता नवा तात्पुरता व्हिसा प्रोग्रॅम घेईल. या माध्यमातून देशातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा नोकऱ्यांसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, असे टर्नबुल यांनी नमूद केले. क्‍लिष्ट स्वरूपाच्या नोकऱ्यांमधील तफावत भरून काढण्यासाठी परकी कर्मचाऱ्यांना येथे आणण्यात येईल; पण केवळ परकी कर्मचाऱ्यांची भरती करणे तुलनेने सोपे असते म्हणून कंपन्यांना बाहेरील मनुष्यबळाचा वापर करता येणार नाही, असेही त्यांनी आपल्या घोषणेत म्हटले आहे.