बॅंक ऑफ इंडियाला 3,969 कोटींचा तोटा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - बॅंक ऑफ इंडियाला मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ३ हजार ९६९ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मागील वर्षी याच काळात बॅंकेला १ हजार ४५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. चौथ्या तिमाहीत बॅंकेच्या उत्पन्नात १३.०८ टक्के घसरण होऊन ते १० हजार ७२२ कोटी रुपयांवर आले. मागील वर्षी याच काळात बॅंकेचे उत्पन्न १३ हजार ३३५ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बॅंकेला ६ हजार ४३ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात बॅंकेला १ हजार ५५८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

Web Title: bank of india 3969 crore rupees loss